top of page

यजमान शहराविषयी

पुणे - भारतीय शेती उद्योगासाठी एक महत्वाचे केंद्र.

कृषीसंशोधन आणि कृषीशिक्षण यामध्ये अग्रगण्य असलेले शहर म्हणजे पुणे. शेतीविषयी जागरूकता निर्माण करणारे, नवीन तंत्राची सर्वप्रथम ओळख करून घेणारे एक सशक्त माध्यम म्हणून पुण्याची ओळख आहे. शिक्षण आणि कला, संगीत, नाटक ह्यांनी संपन्न असे हे मराठी संस्कृतीचे माहेरघर. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम साधून अभिजातता जपणारे, मराठी संस्कृतीच्या राजधानीचा मान मिरवणारे पुणे. शेती क्षेत्रात नियमितपणे होणाऱ्या परिषदा आणि संमेलने ह्यांचे यांचे यशस्वी आयोजन करण्यात पुणे शहर अग्रेसर आहे. देशाच्या मध्यवर्ती असल्याने शेतकरी आणि शेतीव्यावसायिकांना किसानला भेट देणे सोयीचे आहे. पुणे शहर इतर शहरांशी रस्ते, रेल्वे आणि विमानाने जोडले गेलेले आहे.

डिसेंबर महिन्यात पुण्याचे हवामान आल्हाददायक असते.
 

  • कमाल - २८ अंश सेल्सिअस
     

  • किमान - ८ अंश सेल्सिअस
     

bottom of page