किसान प्रदर्शनाचे उद्घाटन नव्या धाटणीने
नमस्कार
गेली २५ वर्षे किसान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते होत आहे. यंदा या सोहळ्याला पारंपारिक संगीताची साथ द्यायची कल्पना आहे.
आपल्या मातीतून उमटलेले, आपल्या हृदयात वसलेले हे संगीत शेतकऱ्यांनी स्वतः अनुभवायचे व सादर करायचे आहे.
तुमच्याकडे लोककलेशी संबंधित कोणतेही खास वाद्य अथवा वादनाची कला अवगत असल्यास आम्हाला या सांगीतिक कार्यक्रमासाठी तुमची साथ हवी आहे.
तुम्हाला या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी व तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया खालील तक्त्यात आपली व आपल्या वाद्याची माहिती भरून आम्हाला द्या.
तसेच त्याचा शेतीशी व शेतकामाशी कसा संबंध आहे ती माहिती पण द्या जसे की, एखादे विशिष्ट वाद्य तुमच्याकडे पेरणी वा कापणी करताना वाजवले जाते...
तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तुमच्याशी लवकरच संपर्क साधू.
या सांगीतिक आणि पारंपरिक वातावरणाने उद्घाटनाला एक नवा रंग चढेल.
तुमच्या उत्साही सहभागाची प्रतीक्षा आहे!
उद्घाटनाची वेळ
बुधवार दिनांक ११ डिसेंबर सकाळी ९ वाजता